Mucormycosis: गरज 2300 इंजेक्शनची, उपलब्ध फक्त ५००

पुणे जिल्ह्यात इंजेक्शनचा तुटवडा; म्युकरमायकोसिस रुग्णाच्या नातेवाइकांची धावपळ
injection
injectiongoogle

पुणे : म्युकरमायकोसिस(mucormycosis) या बुरशीजन्य आजाराच्या(Fungal diseases) रुग्णाला दिवसाला किमान सहा इंजेक्शनची (Injection) गरज भासते. पुणे शहर(Pune City) व जिल्ह्यात(Pune District) रविवारी ३९१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असताना केवळ ५०० इंजेक्शन उपलब्ध झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणीपेक्षा कमी इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने ते मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे.(mucormycosis patients need 2300 injections but only 500 available in Pune)

कोरोनातून बरे झालेल्या गंभीर रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होणे आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याने म्युकरमायकोसिस हा आजार होतो. या रुग्णांच्या शरीरातील बुरशी नष्ट करण्यासाठी ‘ॲम्फोटेरेसिम बी’ या इंजेक्शनची गरज असते. रुग्णाच्या वजनानुसार दिवसाला किमान सहा ते बारा इंजेक्शन दिली जातात.

injection
पाणबुड्यांची फत्तेशिकस्त; पुण्यात ४० वर्षांपूर्वीची जलवाहिनी दुरुस्त

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनच्या पुरवठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आले आहे. रुग्णालयांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा होणे अपेक्षीत आहे. त्यासाठी दररोज दुपारी बारापर्यंत रुग्णालयाकडून यादी मागविली जाते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी काढलेल्या आदेशात पुणे शहर व जिल्ह्यातील ४८ रुग्णालयांमध्ये ३९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासाठी ‘ॲम्फोटेरेसिम बी ५० एमसी’चे ५०० इंजेक्शन पुरविण्यात आले आहेत. तसेच ‘आईसाव्युकॉनाझोल ३७२ एमजी’चे १५ इंजेक्शन पुरविले आहेत. रुग्णांची एकूण संख्या पाहता कमीत कमी २ हजार ३०० पेक्षा जास्त ‘अॅम्फोटेरेसिम बी ५० एमसी’ इंजेक्शनची गरज आहे. परंतु मागणीच्या केवळ २० टक्केच पुरवठा होत आहे.

injection
पुणे : महापालिकेच्या 65 केंद्रांवर लसीकरण

'''अॅम्फोटेरेसिम बी’ हे इंजेक्शन म्युकरमायकोसिस विरुद्ध प्रभावी आहे. हे केवळ बुरशीची वाढ थांबवत नाही, तर त्याला नष्ट करते. हा दुर्मिळ आजार असल्याने सध्या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. संबंधित कंपन्यांनी उत्पादन वाढविणे गरजेचे आहे.''

- डॉ. रमेश मूर्ती, नेत्ररोग तज्ज्ञ

जिल्ह्यातील रुग्ण संख्या : ३९१

दिवसभरात उपलब्ध इंजेक्शन : ५००

injection
‘पंच’नामा : औट घटकेचा राजा, म्हणे वाजवा बाजा

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com