Mud Everywhere at Dehu Phata Bus Stand
sakal
आळंदी - प्रशस्त बसस्थानक... चिखलाचे साम्राज्य... त्यातून वाट तुडवणारे प्रवासी... अंगावर उडणारा चिखल झेलत आळंदीकर प्रवासी सध्या देहू फाटा येथील पीएमपीएमएल आणि एसटी बसमधून चढताना आणि उतरताना दिव्य पार पाडत असल्याचे चित्र आहे. 'अशा पावसात चिखल झाल्यानंतर स्थानकात यायचे कसे, बसमध्ये चढायचे कसे?' असा सवाल वारकरी, महिला आणि विद्यार्थी वर्ग विचारत आहेत. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे एसटी महामंडळ आणि पीएमपीएमएल प्रशासन लक्ष देऊन सुविधा निर्माण कधी करणार, या प्रतीक्षेत प्रवासी वर्ग आहे.