मुकाई चौक ते देहू-आळंदी बस सुरू करा
रावेत, ता. ६ : मुकाई चौक ते देहू आणि आळंदीसाठी बस सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. ही सेवा सुरू झाल्यास परिसरातील भाविकांना दिलासा मिळू शकतो.
रावेत, कातळे वस्ते, आकुर्डी, किवळे, विकासनगर, साईनगर, मामुर्डी, आदर्शनगर, देहूरोड आदी परिसरांतून देहू व आळंदी येथे जाण्यासाठी मुकाई चौक येथून एकही पीएमपी बस उपलब्ध नाही. त्यामुळे गैरसोय सहन करत भाविकांना निगडीपर्यंत जाऊन बस मिळवावी लागते. त्यामुळे अतिरिक्त वेळ आणि पैसे खर्च करावे लागत आहेत.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच पायी प्रवास करू न शकणाऱ्या भाविकांसाठी बस उपलब्ध नसणे ही समस्या ठरत आहे. मुकाई चौक हा महत्त्वाचा बस थांबा असूनही त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे नागरिक सांगत आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुकाई चौक बस स्टॉपवरून देहू व आळंदी येथे जाणारी नियमित बस सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी महापालिका व पीएमपी प्रशासनाकडे करण्यात येत आहे.
किवळे व रावेत परिसरांत अनेक वस्त्या आहेत. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी असून आळंदी व देहूसाठी थेट बस सेवा सुरू झाल्यास या सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा मोठा लाभ होईल.
- रवींद्र कदम, सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

