

मुलींच्या सुरक्षेसाठी संगमनेर
तालुक्यात ‘मुक्कामार’ अभियान
स्वसरंक्षणाचे प्रशिक्षण २७ विद्यालयांमध्ये वर्षभर दिले जाणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः मुलींवरील वाढते अत्याचार आणि असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुलींमध्ये आत्मविश्वास, धाडस आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी संगमनेर तालुक्यात एकवीरा फाउंडेशनतर्फे तालुक्यातील २७ विद्यालयांमध्ये ‘मुक्कामार’ अभियान राबविण्यात येणार आहे. विद्यालयातील मुलींना वर्षभर स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे काही महिन्यांपूर्वी एका शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला झाला होता. त्यात ती मुलगी जखमी झाली होती. त्यातील आरोपीला अजूनही अटक नाही. मुलींना जर प्रशिक्षण दिले तर मुली स्वतः संरक्षण करू शकतात. त्यामुळे वडगाव पान येथूनच मुक्कामार अभियानाची सुरुवात झाली. वडगाव पान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात एकवीरा फाउंडेशन आणि मुक्कामार फाउंडेशन यांच्यात मुलींना वर्षभर प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला.
या वेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, मुक्कामार फाउंडेशनच्या संस्थापक व अभिनेत्री ईशिता शर्मा, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, प्रशिक्षक अक्षिता करकेरा, श्रद्धा सोनार, ऋषभ चोप्रा, विलास दिघे, बाळासाहेब गायकवाड, नीलेश थोरात, अरुण कुळधरण यांच्यासह विविध पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले, की मुलींवरील वाढते अत्याचार ही चिंताजनक आणि दुर्दैवी बाब आहे. चांगला आहार घेऊन शरीर तंदुरुस्त ठेवण्याबरोबर धाडस आणि आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. कुणी त्रास देत असेल किंवा चुकीचे वर्तन करत असेल, तर ते लपवून न ठेवता तातडीने शाळेतील शिक्षक, पालक अथवा पोलिसांना सांगितले पाहिजे. कार्यक्रमाचे नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले. या वेळी शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला होऊन पाच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अद्यापही आरोपीचा शोध लागलेला नाही, ही दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे, असेही डॉ. थोरात म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.