आपच्या पुणे शहर अध्यक्षपदी मुकुंद किर्दत यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

पुणे : नुकत्याच आम आदमी पार्टीच्या राज्य कार्यकारिणीच्या नागपूर येथील बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रभारी दुर्गेश पथक, राज्य संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत व सह संयोजक रंग राचुरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी संयोजकांची नेमणूक करण्यात आली. पुणे लोकसभा मतदार संघ संयोजक पदाची जबाबदारी मुकुंद किर्दत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीच्या स्थापनेनंतर २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर राजकारणात उतराण्याचा निर्णय घेतल्यावर गेली चार वर्षे पार्टीमध्ये मुकुंद किर्दत सक्रीय असून मिडिया सेलची जबाबदारी सांभाळत आहेत. स्त्री-पुरुष समानतेसाठी काम करणाऱ्या 'पुरुष उवाच' गटाचे संस्थापक सदस्य व संपादक आहेत. तसेच नर्मदा आंदोलन समर्थन गट, नारी समता मंच आदी पुरोगामी चळवळीच्या कामात सहभागी असतात.  त्यांनी पु्ण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग मधून पदवी घेतल्यावर २३ वर्षे व्यवसाय करीत आहेत. मराठा चेम्बर्स ऑफ कॉमर्सचा जिल्हा पुरस्कार मिळालेले प्रथम पिढीचे व्यावसायिक आहेत.

छत्रपती शिवाजी आणि फुले, आगरकरांच्या पुण्यात शिक्षण, आरोग्य व सामान्य माणसाच्या आयुष्यातील इतर मुलभूत गरजा पुऱ्या व्हाव्यात, भ्रष्टाचारमुक्त जनहिताचे परिवर्तनाचे राजकारण हा कामाचा केंद्रबिंदू ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम आदमी पार्टीने मतदारसंघात संघटन बांधणीच्या उद्देशाने ही जबाबदारी दिली असून आम आदमी पार्टी या पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

Web Title: Mukund kidart is appointed as president of Pune city