मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
Published on: 

PNE26W61398
अहिल्यानगर ः मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
---------------
व्यसनमुक्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार
मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
अहिल्यानगर, ता. २४ ः तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांचे संसार उदध्वस्त होत आहे. तरुण पिढी व्यसनांपासून दूर रहावी. परिसरात निरोगी सामाजिक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने मुकुंदनगर, गोविंदपुरा, फकीरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेण्याचे ठरविले आहे.
मुकुंदनगर, गोविंदपुरा, फकीरवाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मेजर गयास मिर्झा, डॉ. जी. पी. शेख, ॲड. हनिफ शेख आदी उपस्थित होते.
या सभेत परिसरात व्यसनमुक्ती अभियान राबविणे, अपूर्ण सभागृहाचे काम पूर्ण करणे, ज्येष्ठ विधवा महिला व पुरुषांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणे, तसेच संघाच्या कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी नवीन कार्यकारिणी नियुक्त करणे, असे महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले.
नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी उस्मान मिया शेख यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रऊफ मोहम्मद शेख आणि आलम शफी खान, कार्याध्यक्षपदी आरिफ शेख, सचिवपदी फकीर मोहम्मद इमाम, सहसचिवपदी मिर्झा नवेद अंजुम आणि इस्माईल शेख, तर खजिनदारपदी अब्दुल सईद हाफीज यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारी सदस्यपदी बशीर अब्दुल पठाण, बिलाल अहमद शेख, अजिज हैदर सय्यद, एकबाल गुलाम दस्तगीर सय्यद, शरफुद्दीन जैनुद्दीन शेख, हबीब मकबुल पठाण, अब्दुल कादर मोहम्मद सय्यद, फकीर इनामदार आणि इम्तियाज मुजफ्फर सय्यद यांची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com