
पुणे : मुळा-मुठा नदीतील सांडपाणी शुद्धीकरणासाठी सुरू असलेल्या ‘जायका’ प्रकल्पातील ४९ पैकी केवळ नऊ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची मुदत संपत आली असताना तीन वर्षांत संथ काम होत आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण करा, अन्यथा बिले मंजूर होणार नाहीत, असा इशारा पुणे महापालिकेने ठेकेदाराला दिला आहे.