
पुणे : शहरातील सांडपाणी नदीत येण्यापासून रोखून ते प्रक्रिया करूनच नदीत आले पाहिजे यासाठी महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या मदतीने मुळा मुठा पुनर्जीवन प्रकल्पाचे काम करत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकडे १७१ कोटी रुपयांचा निधी जमा केला होता, पण महापालिकेला मिळत नसल्याने कामात अडथळा निर्माण झाला होता. अखेर हा निधी महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाचे आणखी १७४ रुपये महापालिकेला मिळणे अपेक्षित आहे.