
पुणे : मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पअंतर्गत सुरू असलेल्या नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. वाकड बाह्यवळण ते सांगवी पूल यादरम्यान नदीकाठ सुधारचा दुसरा टप्पा आहे. मागील चार महिन्यांपासून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होते. या आठवड्यापासून पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे.