जुनी सांगवी - परिसरात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा व पवना नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे. नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने महापालिका प्रशासनाकडून मंगळवार रात्रीपासून संवेदनशील सखल भागातील कुटुंबांना महापालिका शाळेत स्थलांतरित केले.