Only 13 of 20 approved Aadhaar centres in Mulshi are reportedly functioning smoothly, while several centres face operational and location-related issues.
sakal
पांडुरंग साठे
कोळवण : मुळशी तालुक्यात एकुण वीस ठिकाणी आधार केंद्रांना जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे त्यामधील तेरा ठिकाणी आधार केंद्र सुरळीतपणे चालू असून उर्वरित सात ठिकाणी असलेली आधार केंद्र हि मंजूर आधार केंद्र एका ठिकाणी तर आधार मशीन सुरु दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी आधार सेंटर मंजूर आहे परंतु ते सुरू करण्यात आले नाही काही ठिकाणी आॅपरेटरच उपलब्ध नाही तर काही ठिकाणी आधार सेंटर हे नेमके कुठे सुरू आहे हे प्रशासनालाच माहिती नाही हि धक्कादायक माहिती खुद्द प्रशासनाकडून स्वराज्य पक्ष मुळशी तालुका प्रमुख राजू फाले यांना देण्यात आली आहे त्यांनी याबाबत तहसीलदार मुळशी यांच्या कडे अर्ज केला होता व या अर्जाला उत्तर पाच आॅगस्ट रोजी तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिले असून या पत्रातून तालुक्यातील आधार सेंटरची सद्य परिस्थिती उघड झाली आहे.