

- पांडुरंग साठे
कोळवण - 'मुळशीतील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला'; आधारचा सावळा गोंधळ, विशेष कॅम्पची मागणी. अशा आशयाची बातमी गुरुवारी ता.०१ रोजी दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित झाली होती. या बातमीची तत्काळ दखल घेऊन मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी आधार कार्ड शिबीरांचे आयोजन शुक्रवार ते रविवारपर्यंत केले असून, तसे आदेश आधार केंद्र चालक यांना पत्राद्वारे जारी केले आहेत.