pune municipal corporation election result
sakal
पौड - नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुळशी तालुक्याच्या विविध गावांतील सहा जणांनी बाजी मारली आहे. त्यात नगरसेवकपदावर बाबूराव चांदेरे यांनी चौकार मारला, तर किरण दगडेपाटील, दिलीप वेडेपाटील, अल्पना वरपे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली, तसेच रूपाली पवार आणि दीपाली डोख या प्रथमच विजयी झाल्या. सहापैकी चार जण भाजपतून तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून एक जण विजयी झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेतही मुळशीकरांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.