

Farmers in Mulshi taluka continue paddy harvesting amid drought concerns and reduced crop prospects.
esakal
कोळवण : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, सर्वजण आनंदात असताना नेहमीच दुर्लक्षित राहिलेला जगाचा पोशिंदा मात्र दिवाळीत दुष्काळाच्या सावटाखाली जगतो आहे. भात काढणीसह इतर कामातून घडणाऱ्या घामाच्या अभ्यंगस्नानातून शेतकरी कष्टाने मोतीरूपी धान्य पिकवीत आहे. सध्या मुळशीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कुटुंबे भात काढणीच्या कामात व्यग्र आहेत.