

पांडुरंग साठे
कोळवण: मुळशी तालुका दुष्काळ ग्रस्त तालुके असलेल्या यादीतून वगळण्यात आला आहे त्याची कारणे अनेक आहेत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष आहेत त्यात जूलै आॅगस्ट महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस पडला पावसाने सरासरी ओलांडली परंतु आता सप्टेंबर आॅकटोबर महिन्यात पाऊस पडला नाही त्यामुळे भात पीक वाळून गेले आहे शेतकरी बांधवांच्या पिकांचे ८०% नुकसान झाले आहे यासाठी तालुक्यात शासनाने मागील आठवड्यात पंचनामे केले आहे व आता नुकसान भरपाई मिळावी म्हणून मी पाठपुरावा करणार आहे प्रसंगी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार आहे कोळवण येथे सोमवार ता. २ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती आमदार मांडेकर यांनी दिली.