मुळशीकरांनो जरा जपून, तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण वाढतायेत; आज...

corona.jpg
corona.jpg

पिरंगुट , ता. १३ : मुळशी तालुक्यात आज कोरोनाचे बारा रुग्ण सापडले असून तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण  संख्या आता २३६ झाली आहे. आज सूस , बावधन व कासार आंबोली येथे प्रत्येकी तीन , हाडशी येथे दोन तर नेरे येथे एक रुग्ण सापडला आहे. आज कोरोना आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये तीन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. आज तालुक्यात एकाही मृत्यूची नोंद  नाही . तालुक्यातील मृतांची संख्या आजपर्यंत पाच इतकी झालेली आहे. घरी सोडलेले रुग्ण वगळता तालुक्यात आता एकूण १६३ रुग्ण कोरोनाबाधित असून  त्यांतील तिघेजण अद्याप अतीदक्षता विभागात उपचार घेत आहेत.  त्यामुळे कोरोनाच्या मुळशीकरांची चिंता अद्याप कमी झालेली नाहीच. 

नोटबंदीमुळं झालं नाही ते कोरोनामुळे शक्य
तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार , उद्यापासून पुढील काही दिवस शासकीय लॅाकडाऊन सुरू केला जाणार आहे. त्यामुळे आज दिवसभर पिरंगुट परिसरात तसेच अन्य गावांतही ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी विविध दुकानांसमोर गर्दी केली होती. घोटावडे फाटा, पिरंगुट कॅंप आदी भागात ग्राहकांनी सगळीकडे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत खरेदी केली. त्यामुळे काही ठिकाणी आजही वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती .  

दरम्यान तालुक्यातील पिरंगुट, घोटावडे, उरवडे, भरे, अंबडवेट, कासार आंबोली तसेच अन्य भागातील औद्योगीक क्षेत्रातील कंपन्या उद्या चालूच राहणार आहेत. मुळशी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के  म्हणाले , " मुळशीतील सर्व कंपन्या लॅाकडाऊनच्या नियमातून वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या या लॅाकडाऊनच्या काळात औद्योगीक कंपन्या चालूच राहतील. "

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com