

Agriculture Day celebration Paud Mulshi
Sakal
कोळवण : मुळशी तालुक्यामध्ये ता .०१ जुलै रोजी पंचायत समिती येथील सेनापती बापट सभागृहात हरितक्रांतीचे जनक व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषि दिन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. कृषि विभाग पंचायत समिती मुळशी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मुळशी यांचे संयुक्त विद्यमाने पौड येथे कृषि दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती मंदाताई शेळके तसेच पंचायत समिती सदस्या काजल मोरे,ऐश्वर्या वाघमारे, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका कृषि अधिकारी हनुमंत खाडे, सहायक गट विकास अधिकारी पल्लवी तेली यासोबत शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.