Paddy crop belonging to farmer Kisan Durge of Mulshi destroyed by fire.
sakal
- पांडुरंग साठे
कोळवण - राज्य सरकारने आज राज्यातील ४० तालुक्यांचा नव्याने समावेश दुष्काळग्रस्त तालुके म्हणून केला असून, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जून्नर तालुक्यांचा समावेश आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या ४० तालुक्यांच्या यादीत मुळशी तालुका मात्र वगळला गेला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून, वारंवार मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुळशी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती सारखी नाही.