The late MP Vitthalrao Tupe Patil Rifle Shooting Range has remained closed for the past six years.
sakal
हडपसर - महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून येथे उभारलेली ऑलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज गेली सहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. सध्या या रेंजची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून हजारो होतकरू नेमबाज खेळाडूंचा त्यामुळे खोळंबा व नुकसान झाले आहे. ही शूटिंग रेंज सुरू करण्यासाठी वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. क्रांती शेतकरी संघाने क्रीडा विभागाकडे त्याबाबत तक्रार केली असून रेंज सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.