Speeding Dumper fire
sakal
पुणे/धायरी - मुंबई- बंगळूर महामार्गावर कात्रज नवीन बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर भरधाव खडी-क्रशर वाहतूक करणाऱ्या डंपरने एकामागोमाग आठ मोटारींना धडक दिली. बुधवारी (ता. १८) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असून, चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.