पुणे - जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे वाढलेल्या गरजा लक्षात घेऊन नागरिकांना त्यांच्या अपेक्षांनुसार घरे सहज शोधता यावीत आणि विविध पर्याय एका ठिकाणी उपलब्ध व्हावेत यासाठी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे..ग्राहकांना घर शोधण्यासाठी मदतीचा ठरणारा हा दोनदिवसीय एक्स्पो शनिवार (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) भरविण्यात येणार आहे. घराबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे याठिकाणी विकसकांच्या प्रतिनिधींकडून मिळणार आहेत. आपल्या हक्काचे घर साकारण्याची वाट पाहत असलेल्या ग्राहकांना तातडीने निर्णय घेण्यासाठी हा एक्स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे घर घेण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे..एक्स्पोमध्ये वन, टू, थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट, बंगलो, रिडेव्हपलपमेंट प्रकल्पातील आरामदायी सदनिका, फार्म प्लॉटसह एनए प्लॉटचे विविध पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. इच्छुक घर खरेदीदारांना त्यांच्या आवाक्यातील किमतीत, हवे तेवढ्या मोठ्या व आरामदायी घरांचे पर्याय या एक्स्पोच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे घर खरेदी बजेटच्या बाहेर जाण्याआधीच आपल्या घराचे स्वप्न साकारता येणार आहे..एक्स्पोची वैशिष्ट्ये३५ हून अधिक विकसकांचा सहभाग१५० हून अधिक प्रकल्पवन, टू, थ्री आणि फोर बीएचके सदनिकाव्यावसायिक जागाबंगलो, फार्म प्लॉट व एनए प्लॉट .हे लक्षात ठेवाकधी : शनिवार (ता. ११ जाने) आणि रविवार (ता. १२ जाने)कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगरकेव्हा : सकाळी १० ते रात्री ८सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.