जगावर कोणत्या देशाची मक्तेदारी नाही एस. जयशंकर ः सत्तेचे मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.६ ः ‘‘जगाची बहुध्रुवीकरणाकडे वाटचाल सुरू असून कोणा एका देशाची मक्तेदारी यापुढील काळात चालणार नाही,’’ असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज केले. विसाव्या शतकाच्या मध्यापासूनची स्थिर जागतिक व्यवस्था कायम ठेवण्याची अपेक्षा अवास्तव होती. तथापि आता सत्तेचे विविध दिशांनी मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण झाले आहे, असे ते म्हणाले.
‘रायसिना डायलॉग’ परिषदेत बोलताना जयशंकर यांनी सात दशकांच्या काळातील जागतिक व्यवस्था विकसित होण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाच्या तुलनेत ७० वर्षे हा केवळ छोटासा भाग असल्याचे ते म्हणाले. जागतिक व्यवस्था बदलण्यामागे दोन मोठ्या शक्ती काम करीत आहेत. त्यातील एक तंत्रज्ञान आणि दुसरा लोकसंख्याशास्त्रीय बदल असेल, असे त्यांनी सांगितले.
जगाला नव्या मार्गाची गरज ः स्टब
नियमआधारित व्यवस्था कालबाह्य झाली असून जगाला नव्या मार्गाची गरज असल्याचे मत फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी व्यक्त केले. भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक करतानाच या देशाला संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व मिळणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. ‘‘जागतिक व्यवस्था बदलणे काळाची गरज आहे. मात्र यासाठी भारतासारख्या देशाला पुढाकार घ्यावा लागेल. पश्चिमी देशांचा प्रभाव कमी झाला असून दक्षिण जगातील देशांची ताकद वाढत आहे. संघर्ष आणि वादाच्याकाळात सहयोग आणि विश्वास यावर आधारित जागतिक व्यवस्था बनणे आवश्यक आहे,’’ अशी अपेक्षा स्टब यांनी व्यक्त केली.
जगाचे राजकारण अमेरिकेच्या अवतीभवती फिरते असे म्हटले जाते. तथापि हळूहळू शक्तीची वेगवेगळी केंद्रे तयार होत आहेत. अर्थव्यवस्था, लष्करीशक्ती, तंत्रज्ञान अथवा कूटनीती याबाबत पूर्ण जगावर सत्ता गाजवेल असा कोणताही देश राहणार नाही.
एस. जयशंकर परराष्ट्रमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

