

मुंबईची हवा बिघडली;
गुणवत्ता निर्देशांक १२७ वर
मुंबई, ता. १८ : मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेतील चढ-उतार सुरूच असून, रविवारी शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२७ वर नोंदवण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा प्रदूषित हवेचा सामना करावा लागला.
मुंबईतील एकूण २२ हवा गुणवत्ता निरीक्षण केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या खाली नोंदवण्यात आला. कांदिवली पश्चिम येथे ८१, मुलुंड येथे ८७, तर शिवडी येथे ९९ असा ‘एक्यूआय’ नोंदवण्यात आला. या भागांतील हवेची गुणवत्ता तुलनेने समाधानकारक होती. उर्वरित बहुतांश भागांमध्ये हवेची गुणवत्ता असमाधानकारक होती. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ॲपवरील आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सहा दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०० च्या पुढे नोंदवण्यात आला आहे.
वाऱ्याचा वेग वाढल्यास प्रदूषक कणांचा निचरा होऊन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याची शक्यता आहे, मात्र वारे मंद राहिल्यास दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हिवाळ्यातही मुंबईतील वायुप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘‘हवामानातील बदलांमुळे रुग्णांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयात जुलाब आणि तीव्र निर्जलीकरणाच्या तक्रारी असलेले रुग्ण येत आहेत. काही रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेटचे प्रमाणही कमी झाले आहे. तपासणीत त्यांच्या मलाचे नमुने सॅल्मोनेला संसर्गासाठी ‘पॉझिटिव्ह’ आढळत आहेत. हे आतड्यांच्या संसर्गाचे लक्षण आहे. हवामानातील चढ-उतारांसोबतच दूषित अन्न आणि पाण्यामुळेही अशा समस्या उद्भवू शकतात,’’ असे डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले.
...
रविवारचा ‘एक्यूआय’
भांडुप - १६३,
अंधेरी - १६१
बीकेसी - १५२
वरळी - १४१
गोवंडी - १४०
मालाड - १३२
घाटकोपर - ११३
कुर्ला - ११२
कुलाबा - १०९
चेंबूर -१०८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.