ठेकेदारांची कोट्यवधींची बिले थकली बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दहा टक्के रक्कम मागणी! सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जिल्ह्यातील प्रकार
कंत्राटदारांची नऊ मार्चला मुंबईत बैठक
राजाळे, ता. २२ : राज्यातील शासनाच्या कंत्राटदारांच्या बाबतीत असलेल्या चुकीच्या प्रशासकीय धोरणावर, तसेच त्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी (ता. नऊ मार्च) मुंबईत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे.
राज्यात मार्च २०२५ मध्ये सर्व विभागाकडील ८९ हजार कोटींची रकमेची देयके प्रलंबित होती. आता मार्च २०२६ उजडले आहे. प्रलंबित देयकांची रकमेची बाकी अद्यापही ७७,५०० कोटी आहे. याचा अर्थ शासनाने १४ महिन्यांत फक्त ११ हजार कोटी रुपये दिले. फक्त १२ टक्के रक्कम वितरित केली आहे, ही कंत्राटदारची आर्थिक गळचेपी व मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची प्रक्रिया शासनाने केली आहे. थकीत बिले काढण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दहा टक्के रक्कम मागणी केली जात असल्याचा आरोप कंत्राटदार संघटनांनी केला आहे.
कंत्राटदारांच्या प्रश्नासाठी व शासनाच्या धोरणाविरोधात निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना या संघटनांची कंत्राटदार यांची राज्यस्तरीय बैठक सोमवारी नऊ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे राज्यातील सर्व क्षेत्रातील व सर्व विभागाकडील कंत्राटदार यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना व महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना यांच्याद्वारे कंत्राटदार महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सिकंदर डांगे यांनी दिली आहे.
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

