भरणेनाक्यात मोटारीची आरामबसला धडक

भरणेनाक्यात मोटारीची आरामबसला धडक
Published on

भरणेनाक्यात मोटारीची
आरामबसला धडक

पाच जखमी; महामार्गावर वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ९ : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाकानजीक आरामबसला मोटारीची पाठीमागून धडक बसली. अपघात आज सकाळी साडेसात वाजता झाला. यात ५ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईहून गोव्याकडे जाणारी आरामबस भरणेनाका येथे प्रवासी उतरवण्यासाठी थांबली असताना मुंबईहून संगमेश्वरकडे मोटारीची पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात प्रतीक्षा परशुराम खेराडे (४८), शिल्पा परशुराम खेराडे (५०), जनार्दन खेराडे (४०), परशुराम गुणाजी खेराडे (६०, सर्व रा. सर्व संगमेश्वर) आणि अर्जुन धोंडिबा चाळके (वय ३०, रा. सातारा) हे पाचजण गंभीर जखमी झाले. त्यांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर परशुराम खेराडे यांच्यावर पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai Goa Highway Fire
Mumbai Goa Highway latest update 2026
fatal jeep accident in sangli maharashtra
wild elephant entering Maharashtra from Goa
Marathi News Esakal
www.esakal.com