
पुणे : अपार्टमेंटमध्ये सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यामुळे अपार्टमेंटमधील छोटे क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे. देखभाल शुल्क आकारणीवरून होणारा वाद या निर्णयामुळे संपुष्टात येणार आहे.