

Mumbai High Court
sakal
पुणे : मुलीच्या हिताचा सर्वांगीण विचार करता तिचा ताबा आईकडेच राहणे योग्य असल्याचे नमूद करत सहा वर्षांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वडिलांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.