

मंचर, ता. १८ : दिल्लीत सोमवारी (ता.२५) जंतरमंतर मैदानावर आयोजित एमआरपी विरोधातील राष्ट्रीय आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. “इंडो-अफ्रिकन समिट”च्या पार्श्वभूमीवर दिल्ली प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ता.१८ मे ते ता.४ जून या कालावधीत जंतरमंतरवरील सर्व कार्यक्रमांच्या परवानग्या रद्द केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले, अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण शाह व राष्ट्रीय सचिव जयंती कथेरिया यांनी दिली. पुढील तारखेची घोषणा लवरकच करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी म्हणाले, "महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आंदोलक दिल्लीत जाणार होते. आंदोलन स्थगित झाले असले तरी एमआरपी विरोधातील जनआंदोलन व जनजागृती मोहीम सुरूच राहणार आहे.''''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.