पुणे - मुंबई राष्ट्रीय बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांवर बडगा

पुणे - मुंबई राष्ट्रीय बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांवर बडगा
Published on

मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत
कर्मचाऱ्यांवर बडगा

सचिव डॉ. धोंडकर यांच्या थेट कारवाईने कर्मचारी धास्तावले

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : मुंबई राष्ट्रीय बाजार समितीमधील सचिवपदी बदली झाल्यानंतर नवनियुक्त सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. शेतकरी, ग्राहकांकडून बेकायदा पैसे घेणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षारक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईने कर्मचारी धास्तावले असून, अशीच कारवाई कायम राहणार की थंडावणार, असा प्रश्न बाजार घटक उपस्थित करत आहेत.
कांदा-बटाटा विभागातील जावक गेटवर पैसे स्वीकारल्याची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर बाजार समिती आस्थापनेवरील एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकाकडून पैसे स्वीकारल्याच्या प्रकरणात एका सुरक्षा कर्मचाऱ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बाजार समिती अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
मुंबई बाजार समिती सातत्याने विविध गैरव्यवहारांच्या कारणांनी प्रसिद्ध आहे. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार, सेस चोरी, टेंडर घोटाळे, नियमबाह्य कामकाज अशा विविध गैरव्यवहारांची जंत्री आहे. शासनाने नुकतेच मुंबई बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा दिल्याने बाजार समितीबरोबरच बाजार घटकांचे महत्त्व वाढले आहे. मात्र, सातत्याने गैरव्यवहारांच्या विळख्यात असलेल्या बाजार समितीला शिस्त लावण्यासाठी बाजार समितीचे अध्यक्ष तथा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असणाऱ्या शरद जरे यांची सचिव म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, काही महिन्यांतच जरे यांना पायउतार व्हावे लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, जरे यांच्या जागी डॉ. राजाराम धोंडकर यांची सचिव म्हणून नियुक्ती केल्यानंतर धोंडकर यांनी कर्मचाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, हा कारवाईचा धडाका आणि सातत्य कायम राहणार की, औट घटकेचे ठरणार, याकडे बाजार घटकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com