Borghat Accident : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकची २४ वाहनांना धडक; आडोशी बोगद्यात १ मृत, १९ जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील आडोशी बोगद्यात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने २४ वाहनांना धडक दिल्याने एकाचा मृत्यू व १९ जण जखमी झाले.
लोणावळा/खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्यात शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने २४ वाहनांना धडक दिली. या विचित्र अपघातात अनिता सहदेव एकंडे या महिलेचा मृत्यू झाला, तर १९ जण जखमी झाले आहेत.