Mumbai-Pune Expressway traffic jam in bor ghat
sakal
लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. प्रजासत्ताक दिन विकेंडला जोडून आला आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हजारो प्रवाशांना तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागत आहे. प्रशासनाचे नियोजन कोलमडल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.