Sinhagad Express: धावत्या रेल्वेवर दगडफेक; सिंहगड एक्स्प्रेसमधील एकाला गंभीर इजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sinhagad Express

Sinhagad Express: धावत्या रेल्वेवर दगडफेक; सिंहगड एक्स्प्रेसमधील एकाला गंभीर इजा

पुणेः लोणावळ्याजवळ सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झालीय.

Pune to Mumbai Express

धावत्या ट्रेनवर टोळक्यांकडून दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात. कधी कधी असे प्रसंग जीवावर बेतले जातात. यासाठी कठोर कायदेही आहेत. परंतु घटना थांबत नाहीत. आज पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या सिंहगड एक्स्प्रेसवर दगडफेकीची घटना घडली आहे. कर्जत लोणावळ्यादरम्यान अज्ञाताने धावत्या ट्रेनवर दगड भिरकावले. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे स्थानकावर या प्रवाशावर उपचार करण्यात आले.

हेही वाचाः का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

अशा घटना वरचेवर वाढत आहेत. मात्र रेल्वे पोलिस कुठल्याही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही. या प्रकरणाचा पुढीत तपास पोलिस करीत आहेत.

हेही वाचा: Gau Raksha : आता 'गो रक्षणा'साठी पगारातून पैसे होणार कपात; भाजप सरकारचा मोठा निर्णय!

टॅग्स :Pune Newsrailway