खारे पाणी गोडे करणाऱ्या मनोरी प्रकल्पाला गती

खारे पाणी गोडे करणाऱ्या मनोरी प्रकल्पाला गती
Published on

समुद्राचे खारे पाणी गोडे
करणाऱ्या प्रकल्पाला गती

‘सीआरझेड’ची मंजुरी; ३५०० कोटींचा खर्च

सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १७ : मुंबईची पाण्याची वाढती गरज भागवण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा ४०० दशलक्ष लिटर क्षमतेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाला अखेर केंद्र सरकारच्या ‘सीआरझेड’ची (किनारी नियामक क्षेत्र) मंजुरी मिळाली आहे. यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून निविदा प्रक्रियेत अडकलेल्या या साडेतीन हजार कोटींच्या प्रकल्पाला आता मोठी गती मिळणार आहे.
​या मंजुरीमुळे पहिल्या टप्प्यातील २०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मालाड, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली आणि दहिसर या पश्चिम उपनगरांतील नागरिकांची पाण्याची चिंता मिटणार आहे. येत्या ८ ते १० दिवसांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मेरिटाइम बोर्डाची मंजुरी मिळणे अपेक्षित असून, पावसाळ्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
...
​प्रकल्पाची वैशिष्ट्ये
​- एकूण खर्च ३,५२० कोटी अपेक्षित
​- एकूण क्षमता ४०० दशलक्ष लिटर
- पहिला टप्पा २०० दशलक्ष, दुसरा टप्पा २०० दशलक्ष लिटर)
- ​समुद्रातून पाणी आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी दोन किमी लांबीचे दोन बोगदे बांधले जाणार
- ​कंत्राटदार म्हणून महापालिकेने या कामासाठी ''जीक्युपीआर'' कंपनीची निवड केली आहे.
...
​पाणीपुरवठ्याला नवसंजीवनी
मुंबईची लोकसंख्या भविष्यात दोन कोटींवर जाण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत मुंबईला सात धरणांतून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणी मिळते. ही गरज अपुरी पडू नये म्हणून पालिकेने मनोरी प्रकल्पासोबतच ‘गारगाई धरण प्रकल्प’ राबवण्याचीही तयारी सुरू केली असून, त्यालाही मंजुरी मिळाली आहे. ''सीआरझेड''च्या या मंजुरीमुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यालानवसंजीवनी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com