

मुंबई-अयोध्यादरम्यान
रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दसरा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते अयोध्या कॅंटोन्मेंटदरम्यान २४ साप्ताहिक विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या व ‘अमृत भारत रॅक’द्वारे चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवा उपलब्ध होणार आहे.
गाडी क्रमांक ०१०४५ ही विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ७.३५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वाजता अयोध्या कॅंटोन्मेंट येथे पोहोचेल. या दिशेने १२ फेऱ्या चालविण्यात येतील. तर गाडी क्रमांक ०१०४६ ही विशेष गाडी २० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी आणि शनिवारी अयोध्या कॅंट येथून दुपारी १.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१५ वाजता ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या दिशेनेही १२ फेऱ्या चालविण्यात येतील. या गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपूर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.