

Pune News
sakal
मुंढवा : महाराज सयाजीराव गायकवाड चौकातील पदपथावर गेल्या अनेक वर्षांपासून खासगी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. गॅरेज आणि भंगार दुकानांनी पदपथ व्यापल्याने पादचाऱ्यांना जीवघेण्या वाहतुकीतूनच चालणे भाग पडत आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेले हे पदपथ पादचाऱ्यांसाठी की व्यावसायिकांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.