उपनगरांतील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी

उपनगरांतील शिवमंदिरांमध्ये 
भाविकांची मांदियाळी
Published on

मुंढवा, ता. १७ : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पूर्व उपनगरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच ‘ओम नमः शिवाय’ आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
मुंढवा- केशवनगर, कोरेगाव पार्क आणि ताडीवाला रोड परिसरातील शिवमंदिरे फुलांनी व आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली होती. भाविकांनी पिंडीवर बेलपत्र, दूध आणि पाण्याचा अभिषेक करून पूजा केली. केशवनगर येथील गायरानातील कुलालेश्वर महादेव मंदिरात पंचक्रोशीतील नागरिकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. येथे मंदिर विश्वस्त संजय दुबे यांच्या हस्ते महादेवाची विधिवत पूजा व आरती करण्यात आली.
ताडीवाला रस्ता येथील नागलिंगेश्वर शबरीमठ, भाजी मार्केट चौक मंदिरांतही सकाळपासूनच गर्दी होती. भाविकांनी शिवलिंगावर तांदळाची ‘शिवमूठ’ अर्पण केली. केशवनगर शिवाजी चौकातील गजानन महाराज मंदिरातही दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरणामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Union Tourism Minister Gajendra Singh Shekhawat visited Bhimashankar Temple with his family, reviewed the ongoing development works, and expressed satisfaction. He also said he would discuss extending darshan timings with the Pune District Collector for the convenience of devotees.
Barabanki Lodheshwar Dham Tourism Project Ancient Pandav Kund to Get High Tech Infrastructure and Facilities
Haridwar
Tapkeshwar Mahadev Temple history
Marathi News Esakal
www.esakal.com