

A truck got stuck in a deep pothole on Mundhwa's Tadigutta Road after allegedly poor sewer line restoration work.
Sakal
पुणे : महापालिकेकडून पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत असा दावा केला जात असताना पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात झाली आहे. मुंढवा येथे सांडपाणी वाहिनीचे काम निकृष्ट केल्याने पडलेल्या खड्ड्यात चक्क ट्रक अडकून पडला. हा ट्रक आडवा होऊ नये म्हणून लाकडाचे टेकन देण्याची नामुष्की ओढावली. या कारभारामुळे महापालिकेवर नागरिकांनी टिकेची झोड उठवली आहे.