

Katraj-Kondhwa road widening project
sakal
कात्रज - कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला भूसंपादनाची प्रक्रिया पुन्हा अडथळा ठरणार आहेत. रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या उर्वरित १० मिळकतींचे भूसंपादन शासनाकडे गेले असले, तरी अद्याप मोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. मोजणी, नवीन निवाडा तसेच त्यानंतरच्या प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मागील अनुभव पाहता आणखी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.