Garbage Project Issue
sakal
पुणे - देवाची उरुळी येथील कचरा डेपोत प्रकल्पांमध्ये नाकारलेल्या कचऱ्याची शास्त्रशुद्धपद्धतीने (सायंटिफिक लँडफिलिंग) विल्हेवाट लावणे आवश्यक असताना तेथे नियमबाह्य पद्धतीने काम करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केली जात आहे. यातील ठेकेदारावर महापालिकेने कारवाई करावी अशी मागणी उरुळी देवाची फुरसुंगी नगरपरिषदेतील नगरसेवकांनी व ग्रामस्थांनी केली.