

Property Tax
ESakal
पुणे - ‘महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून (पीएमवाय) घरे मिळाली आहेत. पण आम्हाला मिळकतकर विभागाने थेट तीन वर्षाचे ३० हजार रुपये बिल पाठवून दिले आहे. उशिरा कर आकारणी केल्याने हजारो रुपयांचा फटका बसला आहे, ही कैफियत आहे हडपसर येथील पंतप्रधान आवास योजनेतील रहिवासी मोहिंदर कौर अरोरा यांची. मिळकतकर विभागाच्या दप्तर दिरंगाईचा फटका अशा प्रकारे तब्बल ३४० सदनिकाधारकांना बसला आहे.