Pune Municipal CorporationSakal
पुणे
Pune News : १४७ कोटीची झाडणकामाची वादग्रस्त निविदा रद्द! ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश
‘सकाळ’ने १४७ कोटी रुपये झाडणकामाच्या वादग्रस्त निविदा प्रकरणाचा भांडाफोड करून प्रकार चव्हाट्यावर आणला होता.
पुणे - शहरातील रस्ते झाडण्याच्या निविदांचे काम ठरावीक ठेकेदारांचा मिळावे यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी निविदेच्या जुन्या अटी शर्तींवर झाडू फिरवून नवीन जाचक अटी टाकल्या. त्यामुळे या निविदेतील स्पर्धा कमी होऊन महापालिकेचे सुमारे ३५ कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान होणार होते.

