Pune Municipal Corporation Demolishes Unauthorized Structure Built on Playground
sakal
पुणे - खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेले सुमारे २१ हजार चौरस फुटांचे बांधकाम पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने जमीनदोस्त केले. यापूर्वी तीन वेळा याठिकाणी कारवाई करूनही पुन्हा सात मजली इमारत बांधल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.