
पुणे - गेल्या दोन महिन्यांपासून पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरु होते. ही प्रभागरचना कशी असणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर आज (ता. २२) सायंकाळी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. यामध्ये ४० प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत. तर एक प्रभाग पाच सदस्यांचा केला आहे. ठरावीक माननियांसाठी तीनचा प्रभाग करण्याचे मनसुबे उधळून लावत एकच पाच सदस्यांचा प्रभाग तयार केला आहे.