

pune municipal election
esakal
पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक प्रभागांत चौरंगी, पंचरंगी निवडणूक होत आहे. काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत, तर काही ठिकाणी बंडखोरी करून अन्य पक्षात गेलेल्या उमेदवारांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे १३ जागांवरील तुल्यबळ उमेदवारांमधील चुरशीची लढत अनुभवता येणार आहे. या उमेदवारांकडून मतदारांवर आपल्या बाजूने वळवून विजय कसा मिळवतात, याकडे लक्ष लागले आहे.