Pune municipal parking issue
sakal
पुणे - महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांकडून शहरातील वाहतूक कोंडी सोडविले जाणार, असे आश्वासन दिले जात आहे. मात्र, ज्या ठिकाणी सगळ्या शहराचा कारभार चालतो तो पुणे महापालिका भवनाचा परिसरच भयंकर वाहतूक कोंडीत अडकला आहे. प्रशासक काळातच या ठिकाणी चारचाकी व दुचाकी लावण्यासाठी जागा शिल्लक नाही.