esakal | पुणे : महापालिकेचे पदाधिकारी पॉझिटिव्ह तर, दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation officer corona positive while two MPs four MLAs home quarantine

महापालिकेचे पदाधिकारी पॉझिटिव्ह तर, दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन, ; पुण्यातील राजकीय क्षेत्र धास्तावले!

पुणे : महापालिकेचे पदाधिकारी पॉझिटिव्ह तर, दोन खासदार, चार आमदार होम क्वारंटाईन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पुण्यात महापौर, उपमहापौर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते यांच्यासह काही नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे शहर व परिसरातील राजकीय क्षेत्र धास्तावले आहे. दोन खासदार, चार आमदार तरच 'होम क्वारंटाईन' आहेत. अनेक लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रम एकदम कमी केले असून काहींनी तर घराबाहेर पडणेच बंद केले आहे. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महापौर, उपमहापौर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तसेच सहा नगरसेवक आणि महापालिकेचे सुमारे 200 अधिकारी व कर्मचाऱयांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच शहरातील कोरोनाच्या रुग्णांची गेल्या चार दिवसांची रोजची सरासरी सुमारे 700 पेक्षा जास्त झाले आहे. पुण्याचे महापौर हे मल्ल आहेत. वय कमी असूनही आणि प्रकृती ठणठणीत असून त्यांनाही कोरोना झाल्यामुळे वय जास्त असलेले अन्य नगरसेवक आता स्वतःची काळजी जरा जास्तच घेऊ लागले आहेत. परिणामी कोरोनामुळे राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. 
-------------
धक्कादायक! आमदाराच्या वडिलांच्या अंत्यविधीला दहा हजार लोक; स्वतःच केली फेसबुक पोस्ट
-------------
सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग !
------------
विरोधी पक्षनेते मुंबईत बैठकीसाठी गेलेले असताना, इकडे त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक खासदार, दोन आमदार यांना 'होम क्वारंटाईन' व्हावे लागले. तसेच त्या बैठकीला असलेले अन्य नेते, अधिकारी व पदाधिकाऱयांनीही सध्या खबरदारीचा उपाय म्हणून घरातच थांबणे पसंत केले आहे. अनेक नगरसेवकांनी पहिल्या टप्प्यात प्रभागात गरजू नागरिकांना मदतीचे किट वाटले होते. परंतु, कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अनेकांनी ही मदत आता थांबविली आहे. त्यातच लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळेही कोरोनाची वाटचाल आता 'कम्युनिटी स्प्रेड'कडे सुरू झाली आहे. 

शहरातील भाजपच्या खासदारांनीही वय लक्षात घेऊन घरातच थांबणे पसंत केले आहे. घरातूनच त्यांनी संपर्क यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शहरातील भाजपच्या मध्य भागातील एक आमदार बऱयाच दिवसांपासून प्रकृतीची काळजी घेण्यासाठी घरीच आहेत तर, एका आमदराची हृदयशस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे तेही घरीच आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही दौऱयांची संख्या कमी केली आहे. तर अन्य तीन आमदारांनी घरात किंवा सुरक्षित स्थळी थांबून गुगल मीटर, गुगल डिअो कॉल आणि मोबाईलवरून संपर्कावर भर दिला आहे. 

महापालिकेच्या अधिकाऱयांनीही लोकप्रतिनिधींना सुबुरीचा सल्ला दिला आहे. काही लोकप्रतिनिधी वयाने ज्येष्ठ आहेत. त्यांना रक्तदाब, मधुमेह आदी व्याधीही आहेत. त्यामुळे त्यांच्या डॉक्टरांनीही घराबाहेर पडूच नका, असा सल्ला दिला असल्याचे एका आमदारांने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. काही नगरसेवकांनी शहरालगत त्यांच्या फार्महाऊसचा आधार घेतला आहे. त्यासाठी तेथे नेट कनेक्टिव्हिटी व्वस्थित असेल, यावर लक्ष दिले आहे. तर महिला लोकप्रतिनिधींनी घरातूनच नागरिकांशी संपर्कावर भर दिला आहे.

loading image