
पुणे - हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने विशेष पथके नेमली आहेत.