Pune Ganpati Immersion water tank ready
sakal
पुणे - गणेशोत्सवातील दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी पुणे महापालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नदीपात्रातील १५ प्रमुख घाटांवर अग्निशमन विभागाकडून २४ तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, ९० जीवरक्षक तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहेत. नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम हौदांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.