एकिकडे वाढतेय गुणवत्ता अन दुसरीकडे शिक्षणाची अनास्था

ब्रिजमोहन पाटील
Sunday, 9 August 2020

अक्षांशा फाउंडेशनच्या शाळांमध्ये मुले शिकत आहेत. आई वडीलही जास्त शिकलेले नाहीत. अशा स्थितीत मुलांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे, घरात मुल शिक्षत असताना पालकही सोबत बसून काही विषय समजावून घेत आहेत. 

पुणे - लाॅकडाऊनमुळे शाळा भरणार नाही, आपली मुलं कशी शिक्षणार असा प्रश्न पालकांना पडला, पण शाळा चालविणाऱ्या संस्थेच्या शिक्षकांनी आॅनलाईन शिक्षणासाठीच्या अडचणी समजून घेऊन, पालकांना विश्वासात घेऊन व्यवस्था तयार केली. माझा मुलगा आता रोज व्यवस्थीत अभ्यास करत आहेत, मला त्यांच्या शिक्षणाची चिंता नाही, असे गंज पेठेतील पुणे महापालिकेच्या आचार्य विनोबा भावे शाळेत शिकणाऱ्या संकल्प दाभेकरचे वडील अनिल दाभेकर यांनी सांगितले. 

एकीकडे पुणे मनपा प्रशासन सांभाळत असलेल्या शाळांचे शिक्षक कोरोना ड्यूटीवर, जे आहेत ते लक्ष देत नाहीत त्यामुळे आपल्या पाल्यांना खासगी शाळेत टाकण्याचा विचार पालक करत असताना, दुसरीकडे आकांक्षा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने चालविल्या जाणाऱ्या मनपा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा आत्मविश्वास वाढला आहे. हा विरोधाभास 'सकाळ'ने समोर आणला आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ड्रायव्हर असणारे अनिल दाभेकर म्हणाले, "यावर्षी शाळा सुरू होणार नसल्याने मुलाच्या शिक्षणाचे कसे होणार हा प्रश्न होता. घरात एकच मोबाईल होता, त्यामुळे शाळेची वेळ व माझे काम याचा विचार केला. मुलांकडे जास्तीत जास्त मोबाईल असेल याचा प्रयत्न करतो. गेल्या महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून माझा मुलगा रोज अभ्यास करतोय हे पाहून मला आनंद होत आहे."

गृहीणी असलेल्या ज्योत्स्ना परमार याचे पती शिवणकाम करतात. लाॅकडाऊनमुळे काम ठप्प आहे. पण त्यांचा मोठा मुलगा १०वीत व छोटा ९वीत असल्याने टेंशन होते, पण आता नवीन मोबाईल घेतला आहे. शाळेतील शिक्षक आम्हाला पूर्ण सहकार्य करतात, त्यामुळे मुलांचा अभ्यास होत आहे. , या शाळेत प्रवेश घेतला तेव्हा माझ्या मुलांना काही येत नव्हते, पण आज त्यांना बर्याच गोष्टी शिकल्या आहेत."

पालकही घेतात धडे
अक्षांशा फाउंडेशनच्या शाळांमध्ये गरीब घरातील मुले शिकत आहेत. आई वडीलही जास्त शिकलेले नाहीत. अशा स्थितीत मुलांना आॅनलाईन शिक्षण दिले जात आहे, घरात मुल शिक्षत असताना पालकही सोबत बसून काही विषय समजावून घेत आहेत. तसेच अाॅनलाईन क्लास सुरू असताना घरात शांतता रहावी, कोणाचेही फोन या वेळेत येऊ नयेत यासाठीही पालक प्रयत्न करतात. ज्या मुलांकडे स्मार्टफोन नाही असे शेजारचे एकाच वर्गातील मुलं एकत्र येऊन सोशल डिस्टन्स ठेऊन एका मोबाईलवर शिकत आहेत, असे सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका दाभाडे यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"सोमवार ते शुक्रवार रोज तीन विषय शिकवले जात आहेत. त्यावर आधारीत परीक्षा घेण्यासाठी गुगल फाॅर्मद्वारे प्रश्नपत्रिका दिली जाते, ती त्यांनी शनिवार, रविवारी सोडविणे अपेक्षित आहे. गुगल ग्लास रूमवर रेकाॅर्डींग केलेले धडे ही शेअर केले जात आहेत."
चिन्मया पोतनीस, मुख्याध्यापिका, आचार्य विनोबा भावे शाळा

आकांक्षा फाऊंडेशनने गुगल क्लास रूम, झूम, एडमोडे याचा वापर करून आॅनलाईन शिक्षण चालू केले आहे. ७० टक्के विद्यार्थी याचा लाभ घेतात. सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी मोबाईल, टॅब मिळावेत यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. तसेच निधी संकलनही सुरू केले आहे," असे अपूर्वा पंडित यांनी सांगितले. 

आयुकाच्या ऑनलाईन कार्यशाळेत राज्यातून 1000 शिक्षकांनी घेतला सहभाग

आकांक्षा फाऊंडेशनद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळा - ७
शिक्षक संख्या - २४७
विद्यार्थी संख्या -३९८७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation school & Akanksha Foundation education