पुणे - उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी बचत करणेही आवश्यक आहे. अति पाणी वापरामुळे आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शहरातील मोठ्या सोसायट्यांना महापालिका पत्र लिहून पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आवाहन करणार आहे. पुढील काही दिवसात हे पत्र सोसायट्यांना मिळणार आहे.
उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अंगाची ल्हाई ल्हाई होत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी घरात कुलर, एसीचा वापर वाढला आहे. अनेक शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई आहे, तेथे पाणी पुरवठा करताना महापालिकेच्या नाकी नऊ येत आहे.
अशातच राज्य शासनाकडून जल व्यवस्थापन पंधरवडा साजरा केला जाणार असून त्या अंतर्गत पालिकेकडून पाणी बचतीसाठीची जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या दैनंदिन पाणी पुरवठ्यापेक्षा सध्या पाण्याची मागणी १० ते १५ टक्के वाढली आहे. त्यामुळे धरणातून पाणी उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. धरणातील पाणी आणखी किमान तीन ते साडेतीन महिने पुरवून वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेकडून सोसायट्यांना पत्र पाठवून जनजागृती केली जाणार आहे.
सोसायट्यांच्या पाण्याच्या भूमिगत टाक्या जुन्या झाल्याने त्यातून पाण्याची गळती होते, जलवाहिनी खराब झाल्याने त्यातून पाणी वाया जाते. अनेक नागरिक गाड्या धुण्यासाठी, अंगणात पाणी मारण्यासाठी तसेच अनेक सोसायट्यांमध्ये जलतरण तलाव असून, तेथे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा वापर करतात. सोसायट्यांच्या टाक्या भरल्यानंतर त्या वेळेत बंद न केल्याने पाणी वाया जाते, घरामध्ये नळ सुरु ठेवून तोंड धुताना किंवा दाढी केली जाते अशा वेळी पाणी वाया जाते.
याठिकाणी पाण्याचा काटकसरीने वापर केला, गळती थांबवली तर पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्यामुळे यासंदर्भात विनंती पत्र करणारे पत्र महापालिकेकडून सोसायट्यांना पाठवले जाणार आहे.
पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘‘पाण्याचा अपव्यय केल्यास महापालिका नोटीस बजावून कारवाई करतेच, पण यावेळी पाणी बचतीसाठी नागरिकांना पत्र पाठवले जाणार आहे. सोसायट्यांनी पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, गळती रोखून किंवा जादा पाण्याचा अपव्यय टाळून बचत करावी असे आवाहन पत्रातून केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.